Header Ads Widget

लातूरच्या खासदारासह आमदारानी सुगाव येथील अमरण उपोषण कर्त्यांची भेट कधी घेणार मराठा आरक्षणासाठी लढतोय हा योद्धा - जिल्हाधिकाऱ्यानी घ्यावी दखल

         माधव पवार
लोहा कंधार विधानसभा मतदार संघाचे विद्यमान  आमदार श्यामसुंदर पाटील शिंदे यांच्यासह लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे त्याच बरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत लोहाचे तहसीलदार यांनी सुगांव येथील एक ६५ वर्षीय मराठा योद्धा हनुमान मंदिरात मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसल्यामुळे सदरच्या उपोषण कर्त्यांची भेट घेऊन सदरचा आरक्षणा मुद्दा सोडविला पाहिजे असे गावकऱ्यातुन बोलल्या जात आहे
लोहा तालुक्याच्या कापशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कोकरे यांनी सदरच्या उपोषण कर्त्याची तब्येत सध्या तरी ठीक असल्याचे सांगितले दिनांक १२ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांच्या तपासणीसाठी आमची आरोग्य विभागाशी टीम सज्ज असल्याचे सांगितले आहे

लोह्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे सध्याच्या परिस्थितीमध्ये रजेवर असल्यामुळे ऑडिशनल चार्ज म्हणून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला असल्याचे सांगितले सदरच्या उपोषणकर्त्याची काळजी मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार मुंडे यांनी सांगितले आहे 

नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील मौजे सुगाव येथील उपोषण करते भगवान पाटील जाधव यांनी जालना जिल्ह्याच्या आंबड तालुक्यातील आंतराली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासह नायगाव तालुक्यातील सतीश पाटील कदम व गजानन पाटील कदम त्याच बरोबर हणमंत पाटील ढगे यांच्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी ६५ वर्षाचा मराठा योद्धा अमरण उपोषण करत असल्यामुळे उपोषणा दुसरा दिवस आहे 



Post a Comment

0 Comments