Header Ads Widget

लोहा पोलिसांचे गणेश उत्सवाच्या निमित्ताने शांतता प्रस्थापित राहण्यासाठी पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पतसंंचालन

       माधव पवार
लोहा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात व शहरात गणेशोत्सवाच्या कार्यकाळात सर्वत्र शांतता प्रस्थपीत राहण्यासाठी व काही अनुचित प्रकार घडून नये म्हणून नुकताच ठाण्याचा पदभार स्वीकारलेले सिघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्वदर्शनाखाली पोलीसांनी शहरात पतसंचल करते वेळी तगडा पोलीसाचा बंदोबस्तात रूट मार्च काढण्यात आला आहे
आगामी काळातील गणेशोत्सव असो की पोळा अथवा दसरा सण असो असे समोर येणारे सण उत्सव पोळा गणपती ईद या संबंधाने कायदा असुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून लोहा शहरात शांतता कायम स्वरूपी राहावी यासाठी लोहा पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख सिंघम पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी लोहा शहरांमध्ये तगडा बंदोबस्त लावला आहे

नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार लोहा कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सुचने नुसार लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी आपल्या पोलीस टीमसह शहरात पतसंचलन काढण्यात आले आहे


लोहा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारे सण उत्सव अनुषंगाने संपूर्ण शहरांमध्ये रूट मार्च घेण्यात आला या मध्ये सर्व अधिकारी कर्मचारी व नांदेड येथील आर सी पी  प्लाटून यांचा सहभाग होता

यावेळी अतिक्रमण धारकावर करवाई करण्यात आली एक दमदार पोलीस अधिकारी म्हणून लोहा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असल्यामुळे शहरातील वाहतूक व अतिक्रमण धारकवार करडी नजर असल्यामुळे लोहा शहरात आता व्यवस्थित शिस्त लागण्यासाठी पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी प्रयत्न करणार आहे 



Post a Comment

0 Comments