Header Ads Widget

शासन आपल्या दारी ऐवजी ग्रामपंचायत कार्यालय आपल्या दारी ही मोहीम राबवली तर गावचा विकास टकाटक होऊ शकतो -

        माधव पवार 
महाराष्ट्र शासनाने शासन आपल्या दारी या मोहिमेची अंमलबजावणी मोठ्या थाटात केली असली तरी सदरची मोहीम ही ग्रामीण भागात फोल ठरली असल्यामुळे गावागावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आत्ता ग्रामपंचायत आपल्या दारी अशी मोहीम जर हाती घेऊन सक्षम पणे राबविली तर नागरिकांच्या समस्या व रस्त्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लाईटचा प्रश्न नाल्या पाण्याचा प्रश्न सुटेल असे जनतेतून बोलल्या जात आहे

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या राज्यात शासन आपल्या दारी मोहिमेच्या अंतर्गत जनसामान्य माणसाचे प्रश्न गावात सुटले पाहिजे या मूळ हेतूने सदरची मोहीम हाती घेतली असली तरी शहरी भागासह ग्रामीण भागात सदरच्या मोहिमेची नीट व सरळ अंमलबजावणी करण्यात येत नसल्यामुळे शासन आपल्या दारी या योजनेला ग्रामीण भागात चांगलाच खो बसला असल्यामुळे या सदरच्या योजने नुसार ग्रामपंचायत आपल्या दारी ही मोहीम प्रभावी राबवली  जावे असे नागरिकांचे म्हणणे आहे 

शासन आपल्या दारी मोहीम ही नावालाच उरली असल्याने कोणता ही प्रशासनातील अधिकारी आज पर्यंतच्या काळात खेड्यापाड्यात येऊन जनसामान्य माणसाच्या समस्या ऐकून घेतला नाही अथवा गावचा विकास पाहिला नाही सदरची शासनानी राबवलेली शासन आपल्या दारी ही मोहीम जनसामान्य माणसाची दिशाभूल करण्याची साध्या रूपात सदरच्या मोहिमेचे धोरण असावे असे ही जनतेतून बोलल्या जात असले तरी ग्रामपंचायत कार्यालय आपल्या दारी ही मोहीम खेड्यापाड्यात राबविले पाहिजे असे जाणकारांचे म्हणणे आहे 



Post a Comment

0 Comments