नायगाव तालुक्यातील ८९ गावातील शेतकऱ्यांनी तात्काळ ई पीक पाहणी करून घ्यावेत यंदा जुलै ते ऑगस्ट महिन्यात तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार पिकाचे पंचनामे करण्यात आले होते
नायगाव तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी मंडळधिकारी व तलाठी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने पंचनामे करण्यात आले असले तरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यानी ई पीक पाहणी करून घ्यावेत असे आवाहन तहसीलदार भगत यांनी केले आहे
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेशानुसार ई-पीक पाहणीच्या या अॅपमुळे शेतकऱ्यांच्या ई पीक पेरणीची अचूक नोंद होणार असून यामुळे कसल्याच प्रकारचे शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही व सरकारची फसवणूक होणार या साठी ई पीक पहाणी करण्याची गरज असल्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त करून घ्यावीत असे आवाहन नायगाव तहसीलदार मंजुषा भगत यांनी केले आहे
पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादना बद्दल अंदाज बांधता येतो शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे.

0 Comments