Header Ads Widget

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने तहसीलदार मंजुषाताई भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीसाचे वितरण - ध्वजा रोहन -

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील विविध शाळेमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांच्या शुभहस्ते दिनांक १५,१६,१७ सप्टेंबर २०२३ रोजी मराठवाडा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात महत्वपूर्ण कार्यक्रमाच्या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला आहे

महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण - 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने नायगाव तहसील कार्यालयातील ध्वजारोहण कर्तव्यदक्षा महिला तहसीलदार मंजुषा भगत यांच्या शुभ हस्ते करण्यात आला असून यावेळी तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी सदरच्या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहून ध्वजाला सलामी देण्यात आली व यावेळी राष्ट्रगीत गाण्यात आले आहे
नायगाव तहसील कार्यालयाच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार मंजुषाताई भगत यांच्या विशेष उपस्थिती मध्ये विविध ठिकाणच्या शाळेत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सदरच्या अमृत महोत्सवा निमित्त वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा एकांकिका पथनाट्य निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होतेमराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्यामुळे सदरच्या कार्यक्रमा निमित्त नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांच्यासह नायगाव मुख्याधिकारी नगरपंचायत नायगाव गटविकास अधिकारी एल वाजे पंचायत समिती नायगाव आणि  गटशिक्षणाधिकारी नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सदरच्या उपक्रमा अंतर्गत पार पडला  असून या कार्यक्रमाला तहसीलदार भगत यांची उपस्थित होते

नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तंटामुक्त अध्यक्ष पोलीस पाटील ज्येष्ठ नागरिक पत्रकार महिला व पुरुष मंडळी त्याच बरोबर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी मोठा उत्साहात साजरा करण्यात आले असल्याचे नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन वर्त प्रकाशित करण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments