महागाईच्या भडक्याच्या काळात पोटाची खळगी भरण्याठी मार्केट मध्ये कोण कोणता व्यापर करील यांचा अंदाज लागत नसल्यामुळे आता नांदेड जिल्हाच्या नायगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात आता सर्दी खोकल्यासाठी गाढवाचे दूध ही पैशाने मिळत आहे
शासकीय दवाखान्यासह खाजगी दवाखाने असताना सुद्धा काही लोक छोटया छोटया मुलाना सर्दी होऊ नये म्हणून दूध खरीदी करत आहे
पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा गाढव निरोगी असल्याचा दाखला नाही - ? राहने आवश्यक !!
एक महिला व पुरुष एक मुलगा यांनी खेड्यापाड्यात गाढवाचे दूध विक्री करीत असताना ५ एम एल १०० रुपयाला तर १० एम एल २०० रुपयाला विक्री करत असताना त्यानी अनेक रोगावर रोगमुक्त होण्याचा दावा करीत असला तरी त्यांच्याकडे कोणत्याही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे सदरचे गाढव निरोगी असल्याचे प्रमाणपत्र नसल्याने गाढव निरोगी की अनिरोगी असा प्रश्न दूध घेताना भेडसावत आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील खेड्या पाड्यात राहणारे लोक आता सर्दी खोकल्यासाठी गाढवाच्या दुधाचा उपयोग केला जात असून एक महिला व पुरुष आलाउन्समेंट करत गावातील रस्त्यावर गाढवाला घेऊन फिरत आहेत या सदरच्या गाढवाच्या दुधामुळे काय कमी अन काय जास्त ? रोग निदान होऊ शकते यांचा अंदाज लागत नसला तरी गाढवाचे दूध सध्या तरी विक्री केल्या जात आहे
नायगाव तालुक्यातील व ग्रामीण भागातील नागरिक आपल्या मुलांना काही सर्दी व खोकला आल्यास तात्काळ शासकीय दवाखाना असो की खाजगी दवाखाना असो या ठिकाणी जाऊन उपचार करून घेताहेत
परंतु गाढवाचे दूध हे छोटया छोटया मुलांना पाजविले तर खरंच सर्दी खोकला कमी होणार का ? लेकराच्या पोटातले आले तर ते कमी होणार का ? असा प्रश्न करणे योग्य ठरणार कितपत खरं आहे

0 Comments