माधव पवार
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेल्या अनेक वर्षा पासून छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत आण्णासाहेब जावळे यांनी मोठा उभारला तेव्हा पासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होत असताना सुद्धा राज्यातले कोणते ही सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चाल ढकल करीत असल्यामुळे मराठा रस्त्यावर उतरावे लागत आहे
छावा संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष प्रताप पाटील सोमठानकर, छावाचे तालुका संपर्क प्रमुख साई पाटील मोरे यांनी असे सांगितले की छावाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत आण्णासाहेब जावळे आज राहिले असते तर मराठा समाजाला आरक्षण मागत असताना व सरकारकडे न्याय मागत असताना पोलीसाचा लाठी चार्ज झाला नसता असे छावाचे नायगाव तालुका अध्यक्ष प्रताप पाटील सोमठाणकर यांनी सांगितले आहे
जालन्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणी दरम्यान आंदोलकावर लाठी चार्ज करण्यात आला यावेळी जर दिवंगत आण्णासाहेब असते तर लाठी चार्ज झाला नसता अशी चर्चा असून आंदोलकांनी जो मंडप उभारला होता त्यात पोलीस घुसले आणि पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला आंदोलकांनी दगडफेक केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे
""" जालन्यात नेमकं काय घडलं ? ""
जालना जिल्ह्यातल्या अंतर्वली गावात ही घटना घडली असून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील या कार्यकर्त्याने काही सहकाऱ्यां सोबत उपोषण चालू केले होते दिनांक २९ ऑगस्ट २०२३ पासून हे उपोषण आंदोलन सुरु होते
मात्र मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागण्या मान्य करण्याच्या अगोदरच उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली होती मात्र त्यांनी उपोषण मागे घेतले नाही त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला लहान मुलं महिला कुणाचा विचार न करता प्रचंड लाठीचार्ज करण्यात आला आहे
"""" मराठा आंदोलकांनी काय म्हटलं आहे ? """
धुळे सोलापूर रस्त्यावर आंदोलकांनी बस आणि वाहनांची जाळपोळ सुरु केली असल्याचे व्रत असून आंदोलकांनी असं म्हटलं आहे की पोलिसांनी आमच्या आंदोलकांना मारण्यास सुरुवात केली आम्ही शांततेत आंदोलन करत होतो तरी ही लाठीचार्ज करण्यात आला असं मराठा आंदोलकांनी सांगितले आहे
""" मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटलं आहे ? """
आम्ही शांततेत आंदोलन सुरु केलं होत आम्ही शांतपणेच उपोषण आंदोलन करत होतो आमच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आमचं ही बोलणं झाले आम्ही शांत का ? बसायचं असं मराठा आंदोलकांनी म्हटल असून एवढंच नाही पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला असला तरी दिवंगत आण्णासाहेब जावळे पाटील असते तर पोलीसाचा आंदोलकावर लाठी चार्ज झाला नसता असे अनेकाचे म्हणे आहे
.

0 Comments