Header Ads Widget

जिल्हा कृषी विभागाची हिमायतनगरात आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा ?

हिमायतनगर : नागोराव शिंदे -

शहरात एकीकडे खत बि-बियाणांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार कारणाऱ्यांवर कारवाईचा इशारा द्यायचा आणि दुसरीकडे त्याच दुकानदारांशी आर्थिक तडजोड ?  असा प्रकार जिल्हा कृषी विभागाने सुरु केला असल्याची चर्चा रंगायला लागली असून जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसह त्यांच्या पथकाचा हा प्रकार हिमायतनगर मध्ये उघड झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे 

हिमायतनगर शहरातील बड्या एका ही कृषी दुकारांची चौकशी न करता जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे हे शहरातील काही कृषी दुकानदारां सोबत  अर्थिक तडजोड करून खडकी फाटा येथील गावरान धाब्यावर बसून जेवणावर ताव मारून निघून गेले असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे

शहरात बी बियाण्याची खतानी व औषधांची कृत्रिम टंचाई करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणुक करण्याचे काम हिमायतनगर शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे ही  पिळवणुक थांबावी यासाठी जिल्हा कृषी विभाग कार्यवाही करते परंतु शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी असलेले कृषी विभाग शहरातील काही कृषी दुकानदारां सोबत आर्थिक ? तडजोड करीत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे

Post a Comment

0 Comments