Header Ads Widget

ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी नायगाव पोलीस ठाण्यावर अपंगाचा भव्य मोर्चा - आमदार राजेश पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी - पोलिसाचा तगडा बंदोबस्त !!

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा रिपाई आमदार राजेश पवार यांच्या विरोधात प्रहार अपंग संघटनेच्या वतीने व दिव्यागांने नायगावच्या पोलीस ठाण्यावर दिव्यांग बांधवाने तुफानी मोर्चा काढला या मोर्चा दरम्यान ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला व ढोल बजाओच्या आवाजाने राज्यात आवाज घुमला आहे
नायगाव मतदार संघाच्या आमदाराच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली ह्या मोर्चेकऱ्यानी आमदार राजेश पवार यांच्या सांगण्यावरून ठाण्यात ॲट्रॉसिटीचा श्रीराम गोविंदराव पवार यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप करीत ढोल बजाओ अशा पद्धतीने थेट मोर्चा पोलीसाच्या दरबारात धडकला  आहे
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ग्रह विभागाने सदरच्या अपंग व्यक्तीची कसल्याच प्रकारची दखल घेतली नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे

या मतदार संघाचे नेतृत्व करणारे व भाजपा रिपाईचे आमदार राजेश पवार यांच्या शिफारसी नुसार त्यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या नौकरा कडून ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप प्रहार अपंग संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे 

तालुक्यातील मौजे आलू वडगाव येथील रहिवासी असलेले श्रीराम गोविंदराव पवार हे एका पायाने अपंग आहेत श्रीराम पवार यांच्यावर दाखल केलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यात यावा आणि अपंग कायाद्या प्रमाणे २०१६ कलम ९२ अ, ब, नुसार कारवाई करण्यात यावा अन्यथा दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी नायगाव पोलीस ठाण्यावर ढोल बजाओ मोर्चा काढण्याचा प्रहर संघटनेच्या वतीने देण्यात आला होता 

प्रहार अपंग संघटनेच्या वतीने दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी काढण्यात आलेल्या ढोल बजाओ मोर्चा हा जिल्ह्यातील नायगाव पोलीस ठाण्यावर धडकवला असल्यामुळे सदरचा मोर्चा पहिलाच असावा असे दिसून आले मोर्चा दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कुंटूर, रामतीर्थ नायगाव पोलीसाचा चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता 

   !! ॲट्रॉसिटी दाखल केलेली खरी की खोटी ? !!

मौजे आलूवडगाव येथील रहिवासी असलेले श्रीराम गोविंदराव पवार हे एका पायाने अपंग आहेत त्यांच्यावर करण्यात आलेली ॲट्रॉसिटी आमदार राजेश पवार यांच्या सांगण्या वरून करण्यात आली असा आरोप होतोय खरा परंतु ॲट्रॉसिटी होण्या मागचे कारणे काय हे पोलीस तपासात निस्पन्न होईलच परंतु आ. पवार यांच्या विरोधात मात्र मोर्चेकऱ्याचा प्रचंड रोष असल्याचे दिसून आले आहे 

ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी नायगाव पोलीस ठाण्यावर अपंगाचा भव्य मोर्चा आमदार राजेश पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी -

Post a Comment

0 Comments