विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :
तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत नायगाव येथील लिटल स्टेप इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बॅडमिंटन व बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नावलौकिक केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची पुढील जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
शहरातील नामांकित असलेल्या लिटल स्टेप शाळेच्या विद्यार्थिनी कुमारी ऐश्वर्या गुरमूलवाड,मयुरी चव्हाण, साक्षी शिवारेड्डी, सय्यद सौदा, अंबिका पुटेवाड या विद्यार्थिनींनी सतरा वर्षे वयोगटात बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तसेच
हर्षनी कुराडे, समीक्षा चव्हाण, वैदवी कांबळे, सृष्टी कदम, स्वरा गादेवार या विद्यार्थिनींनी १४ वर्षे वयोगटात बॅडमिंटन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला असून बहिजा मीर व मुदसिर मीर या विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे
सदर स्पर्धेत यश संपादन करून शाळेचे नावलौकिक केल्याबद्दल या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. रविंद्र पाटील चव्हाण, शाळेचे प्रा. के. यु. गारटे सर, क्रीडाशिक्षक जोगेंद्रसिंह ठाकूर सर, सौ. उपासे टीचर व सर्व स्टाफ यांनी अभिनंदन करून भावी कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्या.

0 Comments