Header Ads Widget

मा.राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि.२१ रोजी रक्तदान व वृक्षा रोपनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

         माधव पवार
माजी राज्यमंत्री तथा खासदार स्व. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे पुत्र कुंटूरकर शुगर कारखान्याचे संचालक राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कारखाना येथे दिनांक २१ ऑगस्ट २०२३ रोजी रक्तदान शिबिरासह वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

अशी माहिती रुई बु येथील सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली असून सदरचा भव्य कार्यक्रम सकाळी १० वाजता कारखाना येथे आयोजित करण्यात आला आहे

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर नगरीचे व या भागाचे भागिवे दाते म्हणून समजल्या जाणाऱ्या स्व.माजी मंत्र्यांच्या पुत्राचा वाढदिवस मोठ्या उत्साहा मध्ये दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी संपन्न झाला त्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक २१ ऑगस्ट २०२३ रोजी भव्य रक्तदान शिबिरा बरोबर वृक्षारोपणाच्या ही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

नायगाव तालुक्यातील कुंटूर शुगर कारखान्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या भव्य कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात रक्तदान करणारे रक्तदाते रक्तदान करून रक्तदान हे श्रेष्ठदान हा महत्वपूर्ण संदेश देण्यासाठी रक्तदाते रक्तदान करणार आहेत

त्यासाठी सदरच्या कार्यक्रमाला या भागातील शेतकऱ्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निलेश देशमुख यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments