नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील मागील दोन आठवड्याच्या तुलनेत पाहिले तर दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजीच्या भाजीपाल्यावर तेजी मधून मंदी आली असल्यामुळे ग्राहकाची बाजारात गर्दी झालेली दिसून येत आहे
गेल्या दोन ते तीन आठवड्यामध्ये प्रचंड तेजी चढली होती दिनांक २० ऑगस्टच्या रविवारच्या आठवडी बाजारात मंदी आल्यामुळे ग्राहकांची भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड होत असल्याचे दिसून येत असून सदर आठवडी बाजार हा गेल्या बारा ते तेरा वर्षा पासून घुंगराळा येथे भरत आहे
नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजीपाल्याचा आठवडी बाजार भरतो आणि दर आठवड्याला सावरखेड वंजारवाडी रुई बु. निळेगव्हाण हिप्परगा सुगाव इज्जतगाव मनुर अंतरगाव बळेगाव रुई खुर्द कुंटूर तांडा देगाव आदी ठिकाणाहून नागरिक
बाजार हट्ट करण्यासाठी घुंगराळा येत आहेत
घुंगराळा येथील बाजारामध्ये मिरची कारले कोथिंबीर दोडके फूलगोबी पान गोबी सिमला मिरची वांगे टमाटे आलू भेंडी दूदगे दिल पसंत शेपू अद्रक कांदे लसुन शेवग्याच्या शेंगा चवळीच्या शेंगा औऱ्याच्या शेंगा पालक अतिशय स्वत झाले असल्यामुळे भाजारा मोठी ग्राहकाची झुंबड होताना दिसून येत आहे ह्या बाजारात शेतकरी आपले भाजीपाला घेऊन येऊन विक्री करत असतात सदरच्या बाजारात तेजी असो अथवा मंदी असो आपला भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेऊन येत असल्यामुळे ग्राहकांच्या संख्येतही वाढ झाली असल्याने सदरचा बाजार हा या परिसरात मोठा असल्यामुळे ग्राहकांची व व्यापाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे चित्र घुंगराळा येथील आठवडी बाजाराच्या चित्रावरून वास्तव चित्र दिसून येत आहे
नायगाव येथील आठवडी बाजार गुरुवारी भरतो तर घुंगराळ येथील बाजार रविवारी भरतो सदरच्या बाजारात नागरिकांना खाण्यासाठी ताजे भाजीपाला या बाजारात विक्रीसाठी येत आहेत त्यामुळे ग्राहकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे

0 Comments