नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या घुंगराळा येथे साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार आर टी पवार व पोलीस कॉन्स्टेबल अशोकराव घुले यांनी चोक बंदोबस्त ठेवला आहे
तालुक्यातील घुंगराळा येथे साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जयंतीचा सोहळा गावातील सर्व धर्माचे बांधव एकत्र येऊन सदरची जयंती साजरी करीत असतात अण्णाभाऊ साठे यांची घुंगराळा येथे आगळी वेगळी साजरी केल्या जाते या सदरच्या उत्साहात महिला व पुरुष मंडळी त्याच बरोबर तरुण वर्ग लहान मुले सहभागी होऊन जयंतीचा सोहळा चांगल्या प्रकारे साजरा करीत आहेत घुंगराळा येथील सर्व समाज बांधवांनी समाज मंदिरापासून आण्णाभाऊच्या जयंती सोहळ्यास प्रारंभ करतात नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गाने निघून गावातील मुख्य रस्त्याने समाज मंदिराकडे नेले जाते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने डीजेच्या तालावर रेकॉर्ड लावून मांगाचा पोरगा हा तलवारीची धार आहे अशा गाण्यावर डान्स करणारे तरुण वर्ग मोठ्या उत्साहात घोषणाबाजी करत दरवर्षी जयंती साजरी करीत आहेत
सदरील अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी कडे कोट बंदोबस्त लावून जयंती सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचे मोठे योगदान असते त्यानुसार सपोनि बहातरे यांच्यासह फौजदार संजय आटकोरे व फौजदार कुसमे यांचे लक्ष ठिक ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कडे होते

0 Comments