आगामी निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादीतील दोन्ही गटांनी आपापलं पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कंबर कसली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर यांची नियुक्ती झाल्याच्या नंतर आता त्यांच्या कडून ग्रामीण भागातील मोर्चेबांधणीला जोरदार प्रयत्न केले जात आहेतजिल्ह्यातील तालुका अध्यक्षांच्या निवडीसाठी मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षां कडून उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला देण्यात आली असून इच्छुकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या मुलाखतीसाठी हजर राहण्याचं अवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर यांनी केले आहेया मुलाखती दिनांक ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता देगलूर येथील शासकीय विश्रामगृहात आणि दुपारी ४ वाजता मुखेड येथील शासकीय विश्रामगृहात तसेच २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कंधार येथील शासकीय विश्रामगृहात आणि दुपारी ३ वाजता लोहा येथील शासकीय विश्रामगृहात तर ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता बिलोली शासकीय विश्रामगृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे
नायगाव येथील शासकीय विश्रामगृहात आणि दुपारी ३ वाजता नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्यावर निष्ठा राखणाऱ्या इच्छुकांनी या मुलाखतीसाठी वेळेत हजर राहण्याच आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी कडून करण्यात आल आहे.

0 Comments