नांदेड जिल्ह्याच्या हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय लोकनेते बाबुरावजी कोहळीकर यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबाची शिवसेना नांदेड उत्तर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख म्हणून निवड करण्यात आली असल्यामुळे त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे
सन २०२४ मधील आगामी काळातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हादगाव हिमायतनगर विधानसभेच्या लोकप्रिय असलेल्या बाबुराव कदम कोहीळीकर यांची निवड झाली असल्यामुळे नक्कीच भविष्य काळात शिवसेनेला यश प्राप्त होईल अशी अपेक्षा लोकनेते कोहळीकर यांनी व्यक्त केली आहे
नांदेड उत्तर शिवसेना जिल्हाप्रमुख पदी बाबुरावजी कदम कोहळीकर यांची दिगज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे बाबुरावजी कदम कोहळिकर हे हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकनेते असून दिगजनांना टक्कर देऊन अपक्ष फॉर्म भरून थोड्या काही मतांनी आमदारकीच्या लढतीमध्ये पराभूत झाले होते
परंतु त्यांनी आजपर्यंत त्यांचा लढा कायम ठेवल्यामुळे आणि त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांची जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
नांदेड उत्तर शिवसेना जिल्हाप्रमुख पदी बाबुरावजी कोहळीकर यांची निवड करण्यात आली आहे

0 Comments