हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणुन प्रार्थना करते तर भाऊ सूध्दा आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधन हे आपल्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन असल्याचे तहसीलदार मंजुषाताई सांगितल्या आहे
राखी पौर्णिमेच्या बऱ्याच अख्यायिका आहेत परंतू त्या माहित करून घेण्यापेक्षा आपण येथे फक्त सणाच्या उद्देशालाच महत्व असल्याचे नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई म्हणाल्या आहोत
आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले असून अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्या पूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते हा टिळा फक्त मस्त काच्या आदराचा नसून भावाच्या मस्त कातील सद्विचार व सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे
सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार भोग लोभ मत्सर वासना द्वेष राग इत्यादींकडे भावाने आपल्या या तिसऱ्या डोळ्याने पहावे या हेतूने बहिण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते इतका त्या टिळ्याचा खोल अर्थ आहे
राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो व मन प्रफुल्लीत होते.
एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्या ही धर्मात अथवा संस्कृतीत नाही सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात रक्ताच्या नात्या व्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो आहे
ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश भावा बहिणींच्या प्रेमळ नात्याची आठवण म्हणजे रक्षाबंधनाचा सण होय - तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी पाठविला आहे

0 Comments