Header Ads Widget

राज्य परिवहन महामंडळाची बस गडगा येथे बस स्टैंड पासून २०० मीटरवर थांबवली धानोरा येथील महिला पळताना पडून जखमी - नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार चौकशी चालू -

         माधव पवार
नायगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गडगा येथे प्रवासी थांबले असताना सुद्धा नरसी ते कंधार राज्य परिवहन महामंडळाची बस चालकासह वाहकाने बस स्टॅन्ड पासून २०० मीटर अंतरावर थांबविले असल्यामुळे सदरच्या बस मध्ये प्रवास करण्यासाठी सदरच्या बसच्या पाटी मागे दोन महिला व एक छोटी मुलगी व एक लहान बाळ घेऊन पळत असताना रंजना  नवघरे जमिनीवर पडली व जखमी झाली आहे

पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांच्या कडून महत्वाचे आवाहन -
सर्व एसटी बस चालक यांना सुचित करण्यात येते की  त्यांनी आपली बस ठरवून दिलेल्या ठिकाणी शेड मध्ये  म्हणजेच बस स्टॅन्ड मध्येच थांबवावी इतर ठिकाणी समोर मागे नेऊन बस थांबवू नये अशा पद्धतीने बस थांबवली आणि त्यामागे लोकं पळताना धावताना चढतांना गाडीचा धक्का लागून काही प्रकार घडल्यास एसटी चालक हे जबाबदार ठरू शकतात व नियमा प्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील  यांची खबरदारी घ्यावी असे आवाहन पोनि चिंचोलकर यांनी केले आहे 
गडगा येथे यातील एक महिला म्हणजे रंजना पिराजी नवघरे झाली असल्यामुळे नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी दिली सदरच्या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहेतालुक्यातील गडगा हे गाव नरसी ते मुखेड कंधार ते नरसी बारूळ मार्गे कौवठा असल्यामुळे ह्या दोन्ही मार्गावर गडगा येथे प्रवाशांची मोठी गर्दी असते परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या चालकासह वहाकाच्या हलगर्जीपणामुळे बस स्टँडवर थांबा असताना सुद्धा बस थांबविले जात नसल्याने प्रवाशांना बसच्या मागे पाठलाग करावा लागत आहे


असाच एक प्रकार दिनांक ३० ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी चार ते साडे चार वाजण्याच्या दरम्यान घडला असल्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ता रामदास दिगंबर भाकरे व मलिकार्जुन भीमप्पा बामणे यांनी सदरच्या जखमी महिलेला रंजना नवघरे राहणार धानोरा तालुका कंधार यांना नायगाव पोलीस ठाण्यात आणल्यामुळे सदरच्या महिलेने तक्रार दिली असून सदरची बस क्रमांक एम एच १४ बी टी २०६८ हा नंबर आहे 

Post a Comment

0 Comments