जिल्यातील हिमायतनगर तालुका पळसपूर येथील रहिवासी असलेले नायगाव फास्ट न्यूजचे विशेष तालुका प्रतिनिधी नागोराव संभाजी शिंदे यांची पोलीस संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या हिमायतनगर तालुका अध्यक्ष पदी नुकतीच निवड झाली असल्यामुळे त्यांच्या निवडी बदल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे
हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर येथील रोखठोक पत्रकार म्हणून ओळखले जाणारे नायगाव फास्ट न्यूज तालूका प्रतिनिधी नागोराव शिंदे हे गेल्या अनेक वर्षा पासून पत्रकारिता क्षेत्रात व सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करत आहेत
आपले कर्तव्य बजावणाऱ्या नागोराव शिंदे यांची पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. संतोष दादा चौधरी यांच्या राष्ट्रीय संपर्क प्रमुख गजानन भगत आदेशानुसार मा. सुनील भाऊ अध्यक्ष महाराष्ट्र यांच्या वतीने निवड करण्यात आली असून पत्रकार नागोराव शिंदे यांच्या निवड सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे

0 Comments