Header Ads Widget

देगलूर विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यासह कृष्णुरच्या सहायक अभियंत्यांनी दलित वस्ती रुई बु येथील सिंगल फेजच्या ट्रान्सफार्मरचा स्फोट तात्काळ पर्याय व्यवस्था करावी मागणी -

         माधव पवार 
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता देगलूर यांच्यासह फिल्टरचे सहाय्यक अभियंता भारती व नायगाव तालुक्यातील कृष्णूर युनिटचे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांनी रुई बु येथील दलित वस्ती मधील सिंगल फेजच्या ट्रान्स फार्मरचा स्फोट झाला असल्यामुळे तात्काळ ट्रान्स फार्मची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे

सध्याच्या परिस्थितीत दलित वस्ती अंधारात असल्याने व पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना कमालीची हेळसांड होत असल्याचे दिसून येत असून सदरच्या अधिकाऱ्यानी २५ चे तीन सिंगल फेजचे ट्रान्सफार्मर तात्काळ द्यावेत अशी मागणी नागरिकांनी केली असून सदरचा सिंगल फेजचा ट्रान्सफार्नर दुरुस्त करण्यासाठी वडजे व शिंदे मोठे प्रयत्न केले मात्र स्फोट झाल्यामूळे दुरुस्त करता आला नाही हे वास्तव चित्र दिसून आले आहे

रुई बु.च्या दलित वस्तीमध्ये विद्युत मीटर ग्राहकाकडे  नसल्यामुळे व अनेक वेळा विद्युत वितरण कंपनीच्या मार्फत आवाहन करून सुद्धा विद्युत मीटर घेण्यासाठी ग्राहक येत नाहीत त्यासाठी विद्युत वितरण कंपनी कडून जास्तीत जास्त दलित वस्ती मधील नागरिकांनी विद्युत मीटर घ्यावेत असे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांनी आवाहन केले आहे 

विद्युत वितरण कंपनीचे देगलूर फिल्टरचे सहायक अभियंता भारती यांनी व कृष्णुर युनिटचे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांनी अनेक वेळा सिंगल फेजच्या ट्रांसफार्मरसाठी प्रयत्न करून दलित वस्तीसाठी ट्रांसफार्मरची व्यवस्था करून दिली परंतु अचानक सिंगल फेजचा ट्रान्सफॉर्मरचा स्पोर्ट झाल्यामुळे दलित वस्ती अंधारमय होऊन नागरिकांना पाणी मिळत नसल्याने भटकावे लागत आहे

विद्युत वितरण कंपनीचे देगलूरचे कार्यकारी अभियंता चेटलावार यांच्यासह फिल्टरचे सहाय्यक अभियंता भारती त्याच बरोबर कृष्णुर युनिटचे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांनी तात्काळ रुई बु. च्या दलित वस्ती मधील लोकांची गैरसोय होत असलेली टाळून येथील नागरिकांसाठी २५ चे तीन ट्रांसफार्मर तात्काळ मिळवून द्यावे असे अपेक्षा दलित वस्ती मधील नागरिकांनी केली आहे

Post a Comment

0 Comments