नायागांव तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मांजरम ते काहाळा सोमठाणा रस्त्यावर अवैध रेतीचा टिप्पर नायगावच्या महिला कर्तव्यदक्ष तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी पकडून दमदार कामागिरी बजावली त्या टिप्परचा आवाहल बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांच्या कडे पाठवण्यात आला आहे
महसूल प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत अवैध रेतीची वाहतूक केल्या जात होती सदरची माहिती महसूल प्रशासनाला मिळताच टिप्पर जात असलेल्या दिशेने रवाना होऊन सदरचा तहसीलदारानी पडकडला होता
नायगाव तालुक्यातील मांजरम व सोमठाणा काहाळा रस्त्यावर पकडण्यात आलेल्या टिप्परवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी बिलोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्याकडे सदरील प्रकरणातील नुकताच आवाहल पाठवला असल्याची माहिती महिला तहसीलदार भगत यांनी दिली आहे
तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अवैध रेतीचे व मुरूम दगड यांना आळा कायमचा बसविण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे तथा पुरोगामी विचाराचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह उपविभागीय अधिकारी बिलोली सचिन गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी कडक कारवाई करण्यासाठी चांगल्याच सरसावल्या असल्याचे सांगण्यात येत आहे

0 Comments