Header Ads Widget

देवाला सोडलेल्या जनावरावर चोरट्याचा डोळा वजीरगावातुन एक गाय चोरी पोलीसाची व गावकऱ्याची चाहूल लागताच क्रुजर पळाली !!

         माधव पवार 
ग्रामीण भागात गावकऱ्यानी आपल्या देवाला सोडलेल्या जान्या गायीवर चोरट्याचा डोळा बसला असून चोरटे गायी चोरण्यासाठी क्रुजरचा वापर करत असल्याची माहिती मिळत असून असा एक प्रकार नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून सदरचे चोरटे रात्रीच्या वजीरगाव येथून महादेवाला सोडलेल्या गायीला क्रुजर मध्ये टाकून अज्ञात चोरटे पळविले असल्याची सांगण्यात येत आहे

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या वजीरगाव येथे दिनांक १६ ऑगस्ट २०२३ रोजी मध्यरात्री म्हणजे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात क्रुझर गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ सदरच्या महादेवाला सोडलेल्या जानी सोडलेल्या दिवसभर  चरून येऊन या ठिकाणी विश्रांतीला बसल्या होत्या या सदरच्या गायी नागोराव सहदेव पाटील ढगे महादेवाला सोडल्या होत्या असे सांगण्यात येते 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल बहातरे यांना गावकऱ्यानी सदरच्या बाबीचा संपर्क करून माहिती दिली असता एक मिनिटाचा विलंब न करता वजीरगाव येथे रवाना होऊन घटनेची पाहणी केली आणि अज्ञात चोरट्याचा तपास घेण्यासाठी अनेक ठिकाणी पोलीस जीपचा लाल दिवा गतिमान करून चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे

अज्ञात चोरट्याने मात्र सदरच्या गाईवर डोळा ठेवून पाच गाई पैकी एक गाय क्रुझर मध्ये टाकत असताना याच गावातील काही तरुण मोबाईलवर खेळत असताना आवाजाची व पोलीस येत असल्याची चाहूल लागताच गाईचे चोरणारे चोरटे एका गाईला घेऊन पळ काढला आहे

या संदर्भात पोलिसांनी सदरच्या चोरट्याचा शोध घ्यावेत असे माजी सरपंच माधवराव संभाजीराव पाटील ढगे गणपती नारायण पाटील ढगे माजी सरपंच नागोराव सहदेव पाटील ढगे माजी सरपंच प्रभू नागुजी वाघमारे पोलीस पाटील उत्तम शेषराव ढगे यांनी मागणी केली आहे 



Post a Comment

0 Comments