माधव पवार
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्षा पासून राजकीय नेत्यांचे सत्तेसाठी गुंतागुंतीचे राजकारण होत असल्याने व चालत असल्यामुळे सदरच्या राजकारणाचा चांगलाच खंडोबा झाला आहे
शेतकऱ्याचे प्रश्न असो की बेरोजगारांची प्रश्न असो या राज्यातील राज्यकर्ते विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यासाठी कोणता ही राजकीय पुढारी धजावत नसल्यामुळे बेरोजगारावर बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे
या राज्यामध्ये राजकीय नेत्यांची गुंतागुंती सत्तेसाठी वाढली असल्यामुळे बेरोजगारावर बोलण्यासाठी कोणता ही राजकीय पुढारी बोलण्यास तयार नाही हे पुढारी तोंडावर बोट ठेवून का ? बसलेत असा प्रश्न बेरोजगारात पडला आहे
येत्या आगामी काळातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असल्यामुळे राज्यातील राज्य करते वेगवेगळ्या स्वरूपाच्या भरत्या काढत असल्या तरी लाखोच्या संख्येने बेरोजगारांची संख्या असून त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे

0 Comments