Header Ads Widget

हिमायतनगर तालुक्यात पावसाची हुलकावनी शेतकरी त्रस्त ८ दिवसा पासून पाऊस गायब


हिमायतनगर : नागोराव शिंदे : - 

हिमायतनगर तालुक्यात गेल्या आठ दिवसा पासून वरून राजाने डोळे वटारल्याने हाता तोंडाशि आलेले मूग उडीद यासह सोयाबीनच्या शेंगा लागण्याच्या सुमारास येत असताना तर कापसाला बोंड लागण्याच्या तयारीत असलेल्याचे दिसून येत आहे

ठिकाणच्या वरून राजा पिकांचा बळी घेत असून असे चित्र तालुक्यामध्ये सद्यस्थितीत दिसत आहेत तर पाऊस उघडुन गेल्यामुळे तालुक्यात उन्हाळ्याचे स्वरूप जणू काय मे महिन्याचे आले आहे 

तालुक्यातील अगोदर शेतकऱ्यांच्या पिकांचे मुसळधार पावसामुळे नुकसान झाले होते प्रशासन पंचनामे केले असताना सुद्धा सध्या तरी शासनाने कसल्याच प्रकारची नुकसान भरपाई देण्यासाठी घोषणा केली नाही त्यात भर  म्हणून हिमायतनगर तालुक्यात पावसाळ्यात उन्हाळा पडल्या सारखे ऊन चमकत आहे

व मोठ्या प्रमाणात गर्मी वाढल्यामुळे शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणात सुकून जात असल्याचे चित्र दिसत आहे 

Post a Comment

0 Comments