Header Ads Widget

नायगाव पोलिसांच्या दमदार कारवाईत २० दिवसात वाहतुकीच्या ३०१ केसेस दाखल तर १ लाख ५९हाजार ५०० रुपयाचा दंड - पोनि चिंचोलकर यांची माहिती

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार बिलोलीचे उपविभागीय अधिकारी हनपुढे पाटील यांच्या सूचनेनुसार नायगाव पोलीस ठाण्यात दमदार पोलीस निरीक्षक म्हणून ओमाकांत चिंचोलकर यांची नेमणूक करण्यात आली असल्यामुळे वीस दिवसात ३०१ मोटार वाहन कायद्या अंतर्गत कारवाह्या करण्यात आल्या असल्याची माहिती पोनि चिंचोलकर यांनी दिली आहे
नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी  रस्त्यात दुकानाचे सामान पाट्या हातगाडी लावणाऱ्यावर ११ गुन्हे दाखल केले आहे

          ""  द ग्रेट नायगाव पोलीस  "''

पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या कारवाह्या चालूच असल्यामुळे तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा कॉटपा कलम  ५,७,२२ प्रमाणे चार गुन्हे दाखल केले असून सदरच्या करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे द नायगाव पोलीस ग्रेट असे सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे 
येथील वाहतूक विस्कळीत झाली असल्यामुळे ती सुरळीत करण्यासाठी लोकांचे वाहने रोडवरच गाडी पार्क करून रोड जाम होत होते त्यांना धडा शिकविण्यासाठी सदरची मोहीम ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांना हाती घेऊन कारवाई करावी लागली आहे 
विशेष बाब म्हणजे मागील ७ महिन्यात एक पण ट्राफिकची केस नायगाव पोलिसात दाखल झाली नव्हती परंतु पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी कारवाईच्या माध्यमातून करून दाखविले रोड वर वाहने उभे करून रोड वर दुकानाचे सामान ठेऊन दुकानाच्या पाट्या रोड वर ठेवून हातगाडी रोड वर लावून जे दुकानदार अतिक्रमण करत होते व रोड जाम करत होते
अशा एकूण ११ लोकांवर या महिन्यात आय पी सी २८३ प्रमाणे एफआयआर दाखल करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

तर अवैध दारू व मटका चालकावर ४ गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर कारवाई फौजदार बाचावार ट्राफिकचे पोलीस अंमलदार शेख,बिट अंमलदार मुस्तापुरे, गंधपवार, साई सांगवीकर,वळगे ,पोलीस अंमलदार पवार,नंदेवार व सर्व कर्मचारी यांनी पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी बजावली आहे 


Post a Comment

0 Comments