Header Ads Widget

यंग इंडिया ग्रोथ मुव्हमेंटचे सी.ई.ओ.संजय वहाडणे यांनी रुई बु येथील वाचनालयासाठी १०० पुस्तकांची भेट


नायगाव फास्ट न्यूज : नेटवर्क :-

छत्रपती संभाजीनगर शिव साई कंस्ट्रक्शन व यंग इंडिया ग्रोथ मुव्हमेंटचे सर्वे- सर्वा व सी.ई.ओ. संजय वहाडणे यांनी मा. श्री. हरीभाऊ बागडे नाना यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील विविध शाळांना ८०  पुस्तक आणि लोखंडी पेटी आशा प्रकारचे साहित्य भेट दिले आहे

विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व भविष्यात ते चांगले विध्यार्थी घडावेत असा त्या मागचा मूळ हेतू असल्याचे त्यांनी सांगितले आहे 

त्याच बरोबर त्यांनी त्यांच्या आॅफिस मधील सहकारी नागनाथ पवार यांचे वडील रावसाहेब पवार हे गावाकडे वाचनालय चालवतात हे कळल्यावर त्यांनी अण्णा भाऊ साठे सार्वजनिक वाचनालय नायगाव तालुक्यातील रुई बु येथील वाचनालयासाठी देखील १०० पुस्तक आणि पेटी भेट म्हणून दिली आहे

त्याबद्दल त्यांचे वाचनालय व गावकऱ्यांच्या वतीने नागनाथ रावसाहेब पवार यांनी आभार  मानले आहे 

Post a Comment

0 Comments