Header Ads Widget

गंगनबीडच्या महादेव मंदिराच्या परिसरात व गर्दीत फिरणाऱ्या टपोऱ्या पोरांना पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी दिला चोप

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गंगबीडच्या महादेव मंदिराच्या परिसरात व गर्दीत फिरणाऱ्या टपोऱ्या पोरांना नायगाव पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक म्हणून कामगिरी बजावत असलेले ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी महादेव मंदिरावर गर्दी असल्याने पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे

महादेव मंदिराच्या परिसरा भोवती व गर्दीत विनाकारण टपोरे पोर फिरत असताना पोनि चिंचोलकर यांनी काही जणांना चांगलाच चोप दिल्याची माहिती आहे

नायगाव तालुक्यातील नायगाव पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी स्वतः आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह गंगनबीडच्या महादेव मंदिराच्या परिसरात पोलिसांचा चौक बंदोबस्त ठेवला आहे 

येथे देव दर्शनाला येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची लूट  व त्यांना कसल्याच प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांचे लक्ष चोरी पाकीटमार लुटारू टपोरे पोर यांच्याकडे जास्तीचे लक्ष केंद्रित करून गर्दीत फिरणाऱ्या टपोऱ्या पोरांना चांगलाच दंड्याचा प्रसाद खावा लागला आहे

तालुक्यातील गंगाबीड हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे ह्या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात श्रावण महिन्यात गर्दी होत असते महिला व लहान मुलांच्या सुरक्षेसाठी व मंदिराच्या परिसरात काही अनुचित प्रकार चोरीच्या घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी मंदिर परिसरात स्वत येऊन थांबले होते

यावेळी काही टपोरे पोरे विनाकारण गर्दीत व परिसरात पुग्या वाजत असताना कुठे तरी सदरची हुलडबाजी थांबली पाहिजे म्हणून पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी देवदर्शनासाठी लोकांची काळजी घेत नजर कैद केली   देवदर्शनासाठी आलात का ? नुसता टुकार पणा करण्यासाठी आलात असा सवाल करीत टूकाराना चोप दिला आहे

Post a Comment

0 Comments