Header Ads Widget

नांदेडच्या दत्तप्रभू प्रा.व उच्च प्रा.शाळा मालेगाव येथे लोकमान्य टिळक व साहित्य रत्न आण्णाभाऊना अभिवादन व गुणवंत विध्यार्थीनीचा विशेष सत्कार !!

        माधव पवार
नांदेड जिल्ह्यासह ग्रामीण भागात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त तर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने नांदेडच्या श्री दत्तप्रभू प्रा.व उच्च प्रा.शाळा मालेगाव रोड तरोडा खुर्द येथे या महामानवाला शाळेच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे
जिल्ह्यात व ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले विशेष कार्यक्रमांच्या निमित्ताने गुरलीन कौर खालसा ही विद्यार्थिनीचा विशेष मान्य वरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आलं आहे 
सदरील अभिवादन सोहळ्याच्या कार्यक्रमा निमित्त यावेळी गुरलीन कौर खालसा ही विद्यार्थिनी ने नांदेड सिख समाजात मुलींमध्ये प्रथम सी ए  झाल्या बद्दल व अमृतपाल कौर सिंधू १२ वी ९७ टक्के मध्ये मुलीं मधून शिख समाजात नांदेड जिल्ह्यात प्रथम आल्या बद्दल त्यांचा सर्व संस्थेच्या वतीने व सर्व शाळेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला आहे 
यावेळी सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष मा.शिवाजीराव धर्माधिकारी शहर जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया काँग्रेस नांदेडचे इंजि हरजिन्दर सिंघ संधू शहर सरचिटणीस नांदेड काँग्रेसचे मा.दिपक सिंघ हजुरिया तालुका अध्यक्ष काँग्रेस सेवादल नांदेडचे मा.राजकमल सिंघ गाडीवाले आदी उपस्थित होते

या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मा.महेश धर्माधिकारी मा.हरमोहिंदर सिंघ खालसा मा.दर्शन सिंघ सिधू,व सर्व शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी परिसरातील पालक वर्ग यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती 

Post a Comment

0 Comments