नायगाव तालुक्यातील कुंटूर ची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही कामकाजाच्या बाबतीमध्ये गतिमान असल्यामुळे तत्कालीन सदरच्या बँकेचे शाखा अधिकारी एम आर हंगरगे यांच्यासह शाखा अधिकारी म्हणून या बँकेला लाभलेले वानोळे यांच्यामुळे सदरच्या बँकेत कामकाजाचा बँकेचा दर्जा सुधारला आहे
तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कुंटूर येथे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात खाते असल्याने व ठेवीदार असल्यामुळे सदरच्या खातेदारावर बँकेचा विश्वास आणि बँकेवर शेतकऱ्यांचा आणि खातेदारांचा विश्वास असल्यामुळे सदरची शाखा सुरळीत चालत आहे
कुंटूर शाखेत / बँकेत येणारे शासकीय अनुदान असो की पिक विमा असो की कर्ज वाटप असो अथवा पंतप्रधान सन्मान योजना अंतर्गत मिळणारे दोन हजार रुपये असो बँकेत जमा झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारची अडचण न भासू देता बँके कडून शेतकऱ्याला दिले जात आहे
कुंटूरची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शाखा अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या गतिमान कारभारामुळे जिल्ह्यात एक नंबर वर चालत असल्यामुळे या बँके मधून शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते आहे
त्याच बरोबर शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारची बँकेत अडचण भासू नये म्हणून शाखा अधिकाऱ्याने शेकडो शेतकऱ्यांना एटीएम दिले बँक कर्मचाऱ्या वरील होणारा ताण तणाव कमी झाल्याचे वास्तव चित्र पाहावयास मिळत आहे

0 Comments