Header Ads Widget

प्रशासनाने आठ दिवसापूर्वी सततधार पावसाचे गांभीर्य लक्षात घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून नायगावच्या तहसीलदारांना निवेदन


सुभाष पेरकेवार नरसीकर

नायगाव तालुक्यात मागील आठ दिवसांपूर्वी झालेला संततधार पाऊस लक्षात घेऊन नायगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा व मागील तीन वर्षापासून सातत्याने नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना अस्मानी संकट काळात भरघोस आर्थिक मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार नायगाव यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे 

तालुक्यात मागील पंधरवड्यात नायगाव तालुक्यात संततधार पाऊस झाला.या पावसामुळे खरिपाच्या पिकांना मोठा फटाका बसला नदी नाले तुडुंब भरून वाहते झाल्यानें लगतच्या जमिनी खरडून गेली आहे

यामुळे मोठ्या आशेने खरीपाच्या पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नशीबी उदासीनता आली आहे

यामुळे सरकारने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी काल मनसे च्या वतीने करण्यात आली.यावेळी तहसीलदार मंजुषा भगत यांना निवेदन देण्यात आले आहे

यावेळी तालुका अध्यक्ष राजेश ताटेवाड मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष राम पांचाल, मनसे विधार्थी आघाडी तालुका अध्यक्ष मारोती बोईनवाड ,आविनाश कदम, वैभव कदम, आनंद कदम, शिवाजी पुंडगे,बाबाराव कदम, अनिल पुंडगे,मारोती वडजे,दिनेश गंधकवाड,सचिन टोकलवाड, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments