Header Ads Widget

शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर पाठीशी पंतप्रधान सन्मान योजनाचा लाभ मिळावा म्हणून नायगावच्या तहसीलदाराला दिले निवेदन !!

        माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून ओळखले जाणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान सन्मान योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्याला मिळावा म्हणून नायगावच्या महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांना शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन दिले आहे 
भाजप सरकारच्या शेतकरी हिताच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेल्या या पी.एम. किसान सन्मान योजनेमुळे देशभरातील शेतकर्‍यांच्या खात्यात वार्षिक ६००० रूपये मदत थेट खात्यात जमा होते असून गेल्या काही महिन्यांपासून या योजनेत समाविष्ट शेतकर्‍यांची नावे  वगळल्याने त्याना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहेभारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर याने शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी राहुल शेतकऱ्यांना सदरच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन दरबारी पाठपुरावा करणार असून शेतकरी हा जगाचा पोशिंदा असल्यामुळे शेतकऱ्यांचे सुख दुःख जाणून घेण्यासाठी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे नेहमी तत्पर असतात असे शेतकऱ्यांतून बोलल्या जात आहे शेतकऱ्यांचा नवीन सातबारा उताऱ्यावर आलेल्या शेतकर्‍यांची नावे या योजनेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया चालू नसल्याने याही शेतकर्‍यांना या योजनेपासून दूर राहावे लागत आहे

या सर्वाना या पी.एम किसान योजनेत समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी मा.श्री.शिवराज पाटील होटाळकर (माजी शिक्षण सभापती तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस नांदेड यांच्या नेतृत्वाखाली नायगांव तहसीलदार मंजुषा भगत यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे 
यावेळी उपस्थित शंकर कौठकर, हनमंत मनूरे, महेश देशपांडे, भाऊ पाटील चव्हाण, स्वस्त धान्य दुकानदार व्यंकटराव पांडे यांचे चिरंजीव बंडू व्यंकटराव पांडे रुई बु प्रदीप देमेवार,  दिपक पाटील रुईकर, सटवाजी मोदलवाड, रामदास पाटील भाकरे, गोविंद पाटील डाकोरे, माधव उपासे, मंगेश पाटील बेंद्रीकर, सुरेश पाटील कदम, त्र्यंबक पाटील, गुरुनाथ पाटील शिंदे, शिवराज पवळे,दत्तहरी मनुरे आदी यावेळी उपस्थित होते 

यावेळी श्रीकांत पाटील शिंदे, दादाराव बेलकर, मुकिन पिंजारी, शिवाजी पाटील ढगे, रामदास पाटील वडजे, संजय बन, बाबाराव पपुलवाड आदिंसह नायगाव परिसरातील शेतकरी व भाजपा कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments