Header Ads Widget

भोकरच्या  ग्रामीण रूग्णालयात कळी उमलताना कार्यक्रमाची विशेष अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगता -

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड डॉ निळकंठ भोसीकर यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक रुग्णालय भोकर डॉ. चव्हाण मार्गदर्शनाखाली विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमा अंतर्गत कळी उमजलना हा विशेष कार्यक्रम दवाखान्यात आकर्षक ठरला आहे 

भोकर तालुका कळी उमलताना कार्यक्रम अंतर्गत एच बी  तपासण्याच्या संदर्भात सदर्षक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या महत्वपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड डॉ.निळकंठ भोसीकर व वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर चे डॉ. चव्हाण यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली दिनांक ७ ऑगस्ट २०२३ रोजी कळी उमलताना  हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा ठरला आहे

ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमां मध्ये एकूण शाळेतील किशोरवयीन मुलीं पैकी‌ ज्या मुलींमध्ये रक्तक्षय आढळून आले अशा मुलींना ग्रामीण रुग्णालय भोकर येथे बोलावून त्यांना  पोषण आहार व  हिमोग्लोबिन वाढवण्याच्या संदर्भात समुपदेशन करून त्यांना औषधी वाठप कण्यात आले आहे

सदरच्या महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी विशेष मान्यवरांची उपस्थिती होती या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉ.चव्हाण डॉ.सारिकाताई मॅडम डॉ टाकळकर डॉ गुंडाळे डॉ.येन्नावार मॅडम संदीप ठाकूर पी ओ .गिरी रावलोड पीओ ,स्वाती सिस्टर ए एन एम धुमाळे सिस्टर  ए एन एम सुरेश डुमलवाड आर के एस के काउनसेलर उपस्थित होते

भोकरच्या  ग्रामीण रूग्णालयात कळी उमलताना कार्यक्रमाची विशेष अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे 

Post a Comment

0 Comments