हिमायतनगर तालुक्यातील रस्त्याची बे व्यवस्था झाली असल्यामुळे सदरच्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधीसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याचे बेदखल दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत असून सध्याच्या परिस्थितीमध्ये पावसाळा चालू झाला असल्याने सदरच्या रस्त्याची चांगली विल्हेवाट लागली असताना सुद्धा या विभागाचे लोकप्रतिनिधी या सदरच्या रस्त्यासाठी निधी मंजूर करतील का ? असा प्रश्न जनसामान्य माणसाला भेडसावत आहे
हिमायतनगर तालुक्यातील विद्यार्थ्यांना खाजगी वाहनातून शाळेत जावे लागते परंतु विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवास आपे ऑटो सारख्या वाहनातून प्रवास करावा लागतो सदरच्या रस्त्याची दुरवस्था व्यवस्था झाली असल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असल्याचे वास्तव चित्र तालुक्यात दिसून येत आहे
सदरचा रस्ता सरसम आबादी ते कोतलवाडी रस्ता असल्याचे सांगण्यात येते परंतु कोणत्या विभागाचा हा महत्वाचा प्रश्न आहे
तालुक्याच्या विकासासाठी अनेक कोटी रुपयांचा निधी आल्याचे घोषणा केल्या जात होत्या परंतु प्रत्यक्षात निधी किती आला आणि आला असेल तर कोणत्या रस्त्यासाठी वापरला हा महत्त्वाचा प्रश्न असून या विभागातील विद्यार्थी ज्या रस्त्याने आप्पे ऑटोच्या माध्यमातून प्रवास करतात तो रस्ता कोणत्या विभागाचा असून या विभागाचे अधिकारी नेमके करतात तरी काय ? तसेच लोकप्रतिनिधी या रस्त्यासाठी निधी का ? मंजूर करत नाहीत असा ही जनसामान्य माणसातून प्रश्न विचारला जात आहे

0 Comments