नायगाव तालुक्यातील कृष्णुर युनिट अंतर्गत असलेल्या मोजे रुई बु.येथे दलित वस्ती मध्ये सहाशे ते सातशे लहान मोठे नागरिक वास्तव्यास असताना सुद्धा या दलित वस्तीमध्ये घरगुती मीटर घेण्यासाठी नागरिक धजावत नसल्यामुळे जळालेले ट्रान्सफॉर्मर घेऊन जाऊन दुसरे चालू ट्रान्सफर आणून बसविण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे थोडक्यात दुर्लक्ष होत आहे
या दलित वस्तीमध्ये विद्युत मीटर नसल्याने तात्काळ घ्यावे असेआवाहन करण्यात आल्याच्या नंतर ही कोणी मीटर घेत नसल्यामुळे सदरचे ट्रान्सफॉर्मर देण्यासाठी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे
तालुक्यातील रुई बु. या गावात गेल्या तीन दिवसापासून दलित वस्ती मध्ये काळोखा अंधार पसरला असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाने या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढावा व ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यावरील विद्युत पुरवठा सुरळीत करावी अशी मागणी होत आहे
या संदर्भात या गावच्या महिला सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी नायगावचे विद्युत वितरण कंपनीच्या उपअभियंत्याशी संपर्क करून सदरची माहिती दिली असताना त्यांनी मला काही बोलू नका देगलूरला बोला असे सांगितले आहे
ग्रामपंचायत कार्यालयानी सदरच्या ट्रांसफार्मरची तात्काळ व्यवस्था करावी कारण एकीकडे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सदरच्या रस्त्याची लाईट चालू राहणे आवश्यक असून दुसऱ्या बाजूने ह्या दलित वस्तीमध्ये घरगुती मीटर नसल्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सदरच्या वस्तीला विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रांसफार्मरसाठी व देण्यासाठी थोडक्यात दुर्लक्ष करीत आहेत
येथील वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अंधारातील अनेक समस्यांचा सामना करावा लागणार असल्याने विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे आपले थकीत बिल असेल तर भरण्यासाठी त्यांना सुचित करावे असे ही काही नागरिकांतून बोलल्या जात आहे

0 Comments