Header Ads Widget

गडगा ते नरसी रोडवर असलेल्या तुळजाभवानी पेट्रोल पंपाच्या जवळ दोन मोटर सायकलची समोरा समोर झालेल्या धडकेत दोन गंभीर जखमी - फौजदार बाचावार घटनास्थळी रवाना

         माधव पवार
नायगाव तालुक्यातील गडगा ते नरसी रोडवर असलेल्या तुळजाभवानी पेट्रोल पंपाच्या जवळ दोन मोटरसायकली आमने-सामने झालेल्या धडकेत दोन गंभीर जखमी झाले असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचलोकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बाचावार यांनी घटनास्थळी रवाना होऊन घटनेची पाहणी केली आहे 

पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गडगा ते मुखेड रस्त्यावर तुळजा भवानी पेट्रोल पंपाजवळ नरसी कडून मुखेड व गडग्या कडून नरसी कडे जाणाऱ्या दोन मोटर सायकलच्या झालेल्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहे

नायगाव पोलीस ठाण्याचे फौजदार एस एस बाचावर यांनी सदरची माहिती दिली असून ही घटना दिनांक १० ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी अंदाजे साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान सदर घटना घडली असल्याचे फौजदार बाचावार यांनी सांगितले आहे

तालुक्यातील गडगा व नरसी मार्गावर असलेल्या तुळजा भवानी पेट्रोल पंपाजवळ सदरच्या दोन मोटर सायकलची समोरा समोर धडक झाली असल्यामुळे सदरची घटना नायगाव पोलीस ठाण्याचे फौजदार एस एस बाचावर यांना कळताच यांनी घटनास्थळी रवाना झाले असल्याचे सांगण्यात येत आहे

गडगा ते नरसी रस्त्यावर झालेल्या अपघातात दोघा पैकी एक जण गंभीर जखमी झाला असल्याचे फौजदार बाचावार यांनी सांगितले सदरील घटनेतील जखमीना प्रथम नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात  आल्याची माहिती असली तरी सदरील घटनेतील जखमीची नावे उपलब्ध झाले नसल्याचे ऑनलाईन व्रत आहे






Post a Comment

0 Comments