नांदेड येथे महसूल दिन साजरा करण्यात आला या सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे डॉ महेशकुमार डोईफोडे आयुक्त नांदेड नां. व श. महानगर पालिका नांदेड पी एस बोरगावकर अप्पर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या विशेष उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे
सदरच्या महसूल दिनाचा कार्यक्रम ओम गार्डन नागार्जून पब्लिक स्कुल समोर कौठा नांदेड येथे दिनांक १ ऑगस्ट २०२३ सकाळी ११ आयोजित करण्यात आला यावेळी नायगावच्या महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांच्यासह तहीलदार संजय वारकड,उज्वला पांगरकर,राजेश लांडगे,राम बोरगावकर,व्यंकटेश मुंडे,श्रीकांत निळे,राजेश जाधव,गाढे,हांदेश्र्वर तहसीलदार महसूल दिनाच्या विशेष कार्यक्रमाला उपस्थित होते
नांदेड जिल्ह्यात व राज्य भरात दर वर्षी दिनांक १ ऑगस्ट रोजी हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो परंतु मागील तीन वर्षे ‘कोविड’मुळे हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा झाला नाही मात्र या वर्षी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली १ ऑगस्ट २०२३ रोजी महसूल दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे
जिल्ह्यात दिनांक १ ते ७ ऑगस्ट २०२३ च्या दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे
महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूल कामे वेळेत पूर्ण करुन त्या नुसार अभिलेख अद्ययावत करणे वसुलीच्या नोटीस पाठवणे मोजणी करणे इत्यादी कामे वेळा पत्रका नुसार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आणि महसूल उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे
शासकीय कामात महसूल विभागाची महत्त्वाची भूमिका असल्यामुळे ऑगस्ट पासून नवीन महसूल वर्षाला सुरूवात होत असल्याने या महसूल दिना पासून सर्व सामान्यांना सुलभ आणि जलद सेवा देण्यासाठी अधिकाधिक डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे
वाढती लोकसंख्या नागरीकरण औद्योगिकी करणाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागातील कामकाजात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे
या डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास नक्कीच मदत होईल सर्व सामान्य नागरिकांचा महसूल विभागाशी दैनंदिन काम काजासाठी संबंध येत असतो त्यासाठी येणाऱ्या काळात महसूल विभाग अधिक लोकाभिमुख पारदर्शक आणि गतिमान होण्या बरोबरच प्रशासनातील सर्व घटकांच्या सक्रिय सहभागावर भर देण्यात येणार आहे

0 Comments