राजकारणात राजकीय पुढार्याची पक्षांतर्गत कधी आदला बदल होईल हे कदाचित कोणाला ही सांगता येत नाही काल परवाच भाजपा पक्षाला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर यांना पक्षानी नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा ह्या गावचे दिलीपराव धर्माधिकारी यांनी राष्ट्रवादी पक्षातून भाजपा पक्षात प्रवेश केला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे भाजपा पक्षाला जय रामजी की करत परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपाला चांगलाच झटका बसला असून भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादीचा हात धरल्यामुळे ग्रामीण भागात भाजपा पक्षाला चांगलीच खिंडार पडली आहे
जिल्ह्यातील व नायगाव तालुक्यातील बरबडा गाव हे जिल्हा परिषद गट असल्यामुळे ह्या गावाकडे सर्वांचे राजकीय पक्षांच्या नेते मंडळीचे लक्ष लागून राहते अशा परिस्थिती मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरबड्याचे दिलीपराव धर्माधिकारी ह्या दमदार नेतृत्वाची नांदेड ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे.

0 Comments