Header Ads Widget

ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी निवासी राहात नसल्याची विजय कुमार पाटील मोरे यांची आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार -

          माधव पवार 
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुका म्हणजे चार तालुक्याशी जोडलेला आणि त्याच बरोबर आंध्रप्रदेश मधील भैसा या ठिकाणी जाण्यासाठी अतिशय महत्वाचा जवळ व सोपा आणि उमरी, किनवट नांदेड हिमायतनगर  जाणाऱ्या रस्त्यावर आहे

या भोकर येथील ग्रामीण रुग्णालयातील महत्वाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी निवासी राहत नसल्याची तक्रार आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे राजकुमार पाटील मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे यांनी केली आहे

भोकर तालुका म्हणजे तेलंगणा राज्याला जोडला गेला असल्यामूळे व इतर तालुक्याशी निगडित असल्यामुळे या मार्गांवर अधून मधून छोटे मोठे अपघात होत असतात परंतु इमार्जेशी काळात या ठिकाणी महत्वाचे अधिकारी व कर्मचारी राहत नसल्याने रुग्णाला थेट नांदेड येथे रेफर करण्यात येते असल्याचा निवेदन कर्त्याच्या आरोप आहे

त्याच बरोबर नांदेड येथून वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर हे लेट लथीफ येत असल्यामुळे रुग्णालयातील रुग्णाची गैरसोय होत असल्याचा आरोप दिलेल्या निवेदनात विजयकुमार पाटील मोरे यांनी केला आहे

जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड डॉ.निळकंठ भोसीकर यांना रुग्ण हक्क संरक्षण समिती मराठवाडा उपाध्यक्ष विजय पाटील मोरे यांच्यासह रुग्ण हक्क संरक्षण समिती नांदेड जिल्हाध्यक्ष, सौ बनसोडे रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा उत्तर जिल्ह्याध्यक्षा यांच्या दिलेल्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत


Post a Comment

0 Comments