Header Ads Widget

नूतन पोलीस निरीक्षक चिंचोळकरयांची नायगावच्या रस्त्यांवरील अतिक्रमण विरोधी दणकेबाज कार्यवाही पाच जनावर गुन्हा दाखल

 विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-

नायगाव  पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक  धडाकेबाज सिंघम ओमकार चिंचोलकर यांनी पोलिसांची कामगिरी काय असते हे दाखवत शहरात सर्व सामान्य जनतेला त्रास देणाऱ्या  रस्त्यावरील अतिक्रमण  व वाहन यांच्यावर धडक कारवाई केली आहे
आयपीसी २८३ व कोटपा कायद्या प्रमाणे पाच गुन्हे दाखल केल्याने रस्त्यावर आतिक्रमण करणाऱ्याचे धाबे दणाणले असून सर्वत्र नायगाव पोलिसांच्या पोनी चिंचोळकर यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

पोलीस स्टेशन नायगाव येथे पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर हे नुकतेच नव्याने रुजू झाले आहेत. त्यांनी नायगाव पोलीस स्टेशनचे सूत्रे हाती घेताच सर्वप्रथम नायगाव मध्ये होत असलेली वाहतूक कोंडी रस्त्यावरील अतिक्रमण या मुद्द्यात हात घातला आहे.
दि.१४आगस्ट सोमवार रोजी नायगाव मधील संपूर्ण शहरामध्ये पूर्ण नायगाव शहरातील रस्त्यावर नायगाव पोलीस यांनी गस्त घालत  स्वतः फिरून रस्त्यावर होणारे अतिक्रमण व मांडलेली दुकाने, दुकानाबाहेर लावलेले सामान, दुकानाच्या बाहेर लावलेल्या रोडवर ठेवलेल्या दुकानाच्या पाट्या याबाबत प्रत्येक दुकानदाराला तंबी देऊन तात्काळ अतिक्रमण काढायला लावले.
    
जर पुन्हा असे अतिक्रमण केल्यास  आयपीसी २८८ प्रमाणे गुन्हे दाखल करणार असल्याची समज दिली. ज्यांनी ऐकले नाही अशा काही लोकांवर आज पोलीस स्टेशन नायगाव येथे २८८ प्रमाणे गुन्हे दाखल केले.
तसेच रोडवर एक लाईन सोडून डबल लाईन करणे आडवी तिडवी रोडवर वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने टू व्हीलर फोर व्हीलर लावने यावर शेकडो गाड्यावर कारवाई करून दंडात्मक कार्यवाही केली.या मुळे शहरात होणारी वाहतुकीची कोंडी थांबणार आहे.व मोकळा श्वास घेण्या साठी मदत होणार आहे.

      !!!!! नव्याचे नऊ दिवस होऊ नये !!!!!

या बरोबरच चिंचोलकर यांनी आपल्या कार्या ची चुनक दाखवत शहरात अवैधपणे तंबाखू ,गुटखा, विकणाऱ्यांवर कारवाई करून तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा प्रमाणे चार गुन्हे दाखल केले आहेत.

नायगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून आपले काम व आपणच असे पोलीस निरीक्षक आल्याने जनसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागत होता 

या पूर्वी अश्या प्रकारच्या कार्यवाही साठी तत्कालीन पोलीस निरीक्षक सुधाकर जगताप यांनी नायगाव शहरात नव्याचे नऊ दिवस न करता पूर्ण अतिक्रमण काढून व देशी दारू दुकान टाइम्च्या बंधनात चालवत व अनेक कार्यवाह्या करून राजकीय विरोध घेतला होता.व  आपली एक वेगळी छाप टाकली होती.अश्या प्रकारची अपेक्षा चिंचोळकर साहेबाकडून सर्व सामान्य जनतेनी व्यक्त केली आहे

Post a Comment

0 Comments