विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-
नायगाव येथिल साई तीर्थ मंगल कार्यालयात पुरुषोत्तम महिन्याच्या निमित्ताने गुरुवर्य भागवताचार्य चैतन्य महाराज कंधारकर (गंगाखेड ) यांचे नायगाव तालुक्यातील शिष्य मंडळी च्या वतीने गुरूपुजन ,पुष्पअर्चना व धोंडवाण कार्यक्रम रविवार दि.१३आगस्ट रोजी घेण्यात आला.या निमित्त प्रारंभी चंद्रकांत महाराज लाठकर यांचे सुश्राव्य हरिकीर्तन व गुरुवर्य चैतन्य महाराज यांचे पुरुषोत्तम मास महात्म्य या विषयावर प्रवचन झाले,या नंतर वे.शा.संपन्न शैलेश महाराज देगलूरकर दत्तू महाराज दरेंगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिष्य मंडळी व प्रतीनीधी म्हणून रमेश मेडेवार या च्या हस्ते सपत्नीक गुरुपूजन करण्यात आले
या नंतर गुरुमंत्र देण्यात आला.त्या नंतर ५१ किलो पुष्पार्पण करून सर्व शिष्य मंडळ यांच्या हस्ते पुष्पाआर्चना करण्यात आली नंतर आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला आहे
या वेळी भक्तगण व भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमास नायगाव तालुक्यातील सर्व भक्त गण व बाहेरच्या तालुक्यातील भक्त गण उपस्थित होते . नायगाव शहरातील साईतीर्थ मंगल कार्यालयात दिनांक १३ आगस्ट २०२३ रोजी पुरूषोत्तम मासानिमित्य सद्गुरू चैतन्य महाराज कंधारकर यांचे गुरू पुजन पुष्पअर्चना अर्पण महाआरती कार्यक्रम नायगावच्या भक्त मंडळींच्या वतीने हा उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भक्त गणाच्या वतीने महाराजांचा शिष्यगण यांनी सपत्नीक आहेर देऊन सन्मान केला व चंद्रकांत महाराज लाठकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम व चैतन्य महाराज यांचे सुश्राव्य प्रवचन झाले या कार्यक्रमाला नायगाव परिसरात भाविकांनी मोठीगर्दी केली होती
कार्यक्रमाचे सुरेख संचलन बाळासाहेब पांडे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी साधुमहाराज संस्थान समिती चे सदस्य बाळासाहेब पांडे,संगम सावकार गंदेवार,बालाजी मेडेवार,मनोज आरगुलवार व सर्व शिष्य गण भक्त मंडळी यांनी प्रयत्न केले.

0 Comments