माधव पवार
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उपविभाग नायगावचे कर्तव्यदक्ष उपाभियंता अनिलकुमार तिवारी यांच्याकडे माजी आमदार पुत्र प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रुई बु.नगरीचे महिला माजी सरपंच पती गजानन भुजंगराव पाटील शिंदे यांनी गेल्या दोन दिवसा खाली दलित वस्ती मधील डीपीच्या संदर्भात समस्या मांडून सदरील नागरिकांना तात्काळ सिंगल फेसचे ट्रान्सफॉर्मर देण्यात यावी अशा पद्धतीची विनंती केली होती
माजी सरपंच प्रतिनिधी गजानन पाटील शिंदे यांच्या विनंती नुसार कर्तव्यदक्ष उप अभियंता अनिल कुमार तिवारी यांनी दलित वस्तीसाठी दोन ट्रान्सफॉर्मरची तात्काळ व्यवस्था करून दिली आहे
तालुक्यातील रुई बु. येथील मागासवर्गीय दलित वस्ती मध्ये लहान मोठे ६०० ते ७०० लोक नांदत असतात परंतु अचानकपणे सिंगल फेजच्या ट्रांसफार्मरचा स्फोट झाल्यामुळे सदरील वस्ती मधील विद्युत पुरवठा सर्व खंडित झाला होता
नागरिकांना पाणी मिळावे म्हणून गावच्या महिला सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी रमजान डीपी वरून पाण्याची व्यवस्था करून दिली परंतु दलित वस्ती अंधारात राहत असल्याने प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गजानन पाटील शिंदे यांनी सदरचे ट्रान्सफॉर्मर देऊन दलित वस्ती प्रकाश मय करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे
नुसार विद्युत वितरण कंपनीचे कर्तव्यदक्ष उपाभियंता अनिल कुमार तिवारी यांनी सदरच्या ट्रांसफार्मरची व्यवस्था करून दिली असल्याचे गजानन शिंदे यांच्या कडून आभार व्यक्त केल्या जात आहे
माजी उपसरपंच दत्ता पाटील जाधव उत्तम पिंपळे देविदास मागीलवाड भारत विभुते माधव गंगातीरी मानिका टोकलवाड पंढरी पवार बालाजी पवार आदी सह -
दत्ता पवार मारोती पवार आनंदा वाघमारे केशव पवार प्रभाकर पवार गंगाधर कांबळे खंडू वाघमारे बापूराव वाघमारे भगवान वाघमारे लहुजी पवार अविनाश कांबळे प्रल्हाद पवार प्रभाकर पाटील जाधव सुधाकर पांडे पंढरी गंगातिरे प्रभाकर कानोले आदीने अभिनंदन केले आहे

0 Comments