सरकारने जनतेच्या सेवेसाठी शासकीय दवाखान्याच्या मोठ मोठाल्या इमारती बांधून तमाम जनतेच्या सेवेत दिल्या आहेत
आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णालयात मोफत सुविधा रुग्णाला मिळत असताना रुग्णाचा तात्काळ इलाज व्हावा म्हणून जनसामान्य माणूस खाजगी रुग्णालयाकडे मोठ्या प्रमाणात वळत असले तरी सदरच्या दवाखान्यां मध्ये गोरगरीब जनतेच्या खिशातून शेकडो रुपयांच्या वर खाजगी रुग्णालयाचे बिल होताना दिसून येत आहे
सर्वात महत्वाची बाब म्हणजे शासकीय दवाखान्यां मध्ये औषध पुरवठा कमी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे सदरचे रुग्ण खाजगी रुग्णालयाकडे वळतात की काय ? असा ही प्रश्न जनतेला भेडसावत असून शासनाने जनतेच्या सेवेसाठी मोफत दवाखान्यात सेवा देत आहे
ग्रामीण भागातील रुग्ण खाजगी रुग्णालयात जाऊन व लाखो रुपयाची बिले भरत आहेत उपचार घेत आहेत परंतु शासनाच्या मोफत सेवेकडे का ? वळत नाहीत असा ही प्रश्न जनसामान्य माणसाला पडला आहे
गोरगरीब जनतेने तरी शासकीय दवाखान्यां मध्ये जास्त उपचारासाठी दाखल होऊन विलाज करून घेतला पाहिजे ही महत्त्वाची बाब आहे
सरकारी दवाखान्या मध्ये एका पेक्षा एक तज्ञ डॉक्टर असताना सुद्धा ग्रामीण भागातील जनसामान्याची माणसाची ओढ खाजगी दवाखाना कडे लागली असल्यामुळे गोरगरिबांची चांगलीच वाट लागत असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
प्रशासनाने व आरोग्य विभागाने शासकीय दवाखान्यां मध्ये जास्तीत जास्त औषधाचा पुरवठा व कर्मचाऱ्यांच्या रिक्त भरणे गरजेचे सुद्धा आहे

0 Comments