Header Ads Widget

राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांच्यावर पक्षाने टाकली मोठी जबाबदारी !!

               माधव पवार
राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत असताना व पक्षाने टाकलेली जबाबदारी पार पाडत असताना मोठी काळजी घेऊन काम करावे लागते त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांची पक्षाने निवड केल्याच्या नंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली असल्यामुळे धर्माधिकारी यांनी भोकरचा दौरा केला आहेनांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा येथील दमदार नेतृत्वांचे दमदार राजकीय पुढारी म्हणून ओळखल्या जाणारे दिलीपराव धर्माधिकारी यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी व कार्यकर्त्यांची जुळवा जुळवी करण्यासाठी दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर यांच्या कडून मोठी कसोटी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे

जिल्ह्यातील बडबडा गावाकडे राजकीय वर्तुळातील सर्वच राजकीय पुढार्‍यांचे लक्ष जिल्हा परिषद गट बरबडा गटाकडे असते राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांची नुकतीच निवड झाली आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळाचे काटे टकाटक चालण्यासाठी राष्ट्रवादी पक्षांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत असून दिलीपराव धर्माधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादी एन्ट्रीमुळे ग्रामीण भागात पक्ष दणकट बनणार आहे 




Post a Comment

0 Comments