महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे योगेश पाटील नंदनवनकर यांच्या वतीने गेल्या महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या लोहा कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना सुद्धा सदरचे दोन्ही तालुके अतिवृष्टीच्या नुकसानी पासून वगळले असल्यामूळे शेतकऱ्यासह योगेश पाटील नंदनवनकर यांनी संताप व्यक्त केला आहे
जिल्ह्यात गेल्या महिन्यात मुसळधार पावसाने या भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यासह उपविभागीय अधिकारी यांनी प्रशासकीय दौरा करून तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्याच्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे योगेश पाटील यांनी नुकतेच निवेदन देऊन कळविले आहे
राज्याचे कृषी मंत्री महोदय धनंजय मुंडे यांच्यासह लातूर
लोकसभा मतदार संघाचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांना सदर बाबीची संपर्क करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचेे योगेश पाटील नंदनवनकर यांनी माहिती दिली असल्याचे त्यानी सांगितले आहे
नांदेड जिल्ह्याच्या लोहा कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असताना सुद्धा या विभागाचे लोकप्रतिनिधी व शासन जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामूळे शेतकरी सदरच्या अनुदाना पासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप योगेश पाटील नंदनवनकर यांनी केला आहे
लोहा आणि कंधार तालुका वगळून टाकण्यात असल्यामुळे सदरच्या तालुक्याची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह उपविभागीय अधिकारी लोहा कंधार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांच्या जमिनी पावसाने खरडून गेल्या आहेत
प्रशासननाने यांची चौकशी करून तात्काळ पंचनामे करावेत अन्यथा प्रशासनाच्या दरबारात गाढव मोर्चा काढण्याचा नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना योगेश पाटील नंदनवनकर यांनी इशारा दिला आहे

0 Comments