Header Ads Widget

रुई येथे दलित वस्तीसाठी २५ चा ट्रांसफार्मर चालतो मस्त परंतु त्यावर सिंगल फेसची मोटार ही चालेना आणि पंखा ही चालेना -

         माधव पवार
नायगाव तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी  कृष्णुर युनिट अंतर्गत असलेल्या रुई बु येथील दलित वस्तीसाठी सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांनी मोठे प्रयत्न करून २५ चा सिंगल फेसचा ट्रांसफार्मर दिला आहे

परंतु चालण्यासाठी मस्त असला तरी त्या ट्रांसफार्मर वर ग्रामपंचायत कार्यालयाची सिंगल फेसची मोटार ही चालत नाही आणि घरातील पंखे ही चालत नाहीत कमी स्पीडने चालत असल्यामुळे सदरच्या विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुसरा सिंगल फेसचा ट्रान्सफॉर्मर तात्काळ देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे

तालुक्यातील रुई बु येथील दलित वस्ती ही सहाशे ते सातशे लोकांची वस्ती असल्यामुळे या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाचे दोनच बोअर असताना ते व्यवस्थित चालत नसल्यामुळे अधिकाऱ्यानी दुसरा ट्रांसफार्मर बसविण्यात यावा अशी मागणी होत आहे 

२५ च्या ट्रांसफार्मर वर कमी प्रमाणात विद्युत पुरवठा होत असल्यामुळे सदरच्या मोटारी चाण्यासाठी स्पीड विद्युत पुरवठा करणाऱ्या २५ च्या ट्रान्सफॉर्मरची आवश्यक असल्यामुळे कृष्णुर युनिटचे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांनी दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था करावी अशी मागणी दलित वस्तीच्या वतीने करण्यात येत आहे

रुई बु.च्या दलित वस्तीमध्ये सध्याच्या परिस्थिती मध्ये एकच ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे व दोन ट्रान्सफॉर्मर जळाले असल्यामुळे या सुद्धा ट्रान्सफार्मर वर लोड येऊन जळण्याची शक्यता असल्यामुळे व कमी स्पीडने विद्युत पुरवठा सदरचा ट्रांसफार्मर करत असल्याने अचानक कधी ही बंद पडू शकतो ही शक्यता नाकारता येत नसल्याचे दिसून येत आहे

सदरच्या सहाय्यक अभियंत्याने दलित वस्तीसाठी निदान एक तरी सिंगल फेस चा ट्रांसफार्मर देण्यात यावा अशी अपेक्षा दलित वस्ती मधील नागरिकांनी केली आहे 



Post a Comment

0 Comments