हिमायतनगर नागोराव शिंदे -
नांदेड येथील प्रसिद्ध डॉक्टर श्री रमेश नारलावार यांच्या नेतृत्वाखाली " सनातन मित्र मंडळ, नांदेड " यांच्या वतीने अप्पारावपेठ हल्यातील पिडीत गोरक्षक कार्यकर्ते आणि शहीद गोरक्षक शेखर रापेल्ली यांच्या कुटुंबीयांना १००००० रूपयांची मदत करण्यात आली आहे
तर ४ जख्मी गोरक्षकांना प्रत्येकी ५०००/- रूपयांची मदत केली आहे. यावेळी डॉ नारलावार म्हणाले, आज समाजात धर्माच्या कार्यासाठी जोखीम पत्करून कोणी पुढे यायला तयार नाहीत, अशावेळी गोरक्षणा सारख्या अत्यंत जोखमीचे काम करने हे सामान्य गोष्ट नाही. मी अनुभवले आहे
किरण बिच्चेवार यांच्या टोळीतील प्रत्येक गोरक्षक कार्यकर्ता आपापल्या कोटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडुन गोरक्षणाचे पवीत्र कार्य करता. आपल्या गोरक्षकांपैकी एकही कार्यकर्ता रीकामा नाही, कोणी शेती, कोणी व्यापार, घर, परीवार निट सांभाळुन प्रामाणिकपणे गोरक्षणाचे कार्य करणाऱ्या तुम्हा सर्वांना नमस्कार करतो आहे
ते पुढे म्हणाले हिंदु समाजाने अशाप्रकारे पारदर्शकपणे आपले प्राण धोक्यात घालुन गोरक्षण करणाऱ्या गोरक्षकांच्या पाठीमागे. ठामपणे उभे टाकले पाहिजे. संकटात सढळ हाताने मदत केली पाहिजे, तेच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आम्ही हे प्रयोग केला आहे.
यानंतर किरण बिच्चेवार, नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत म्हणाले आज डॉ नारलावार साहेबांच्या नेतृत्वाखाली " सनातन मित्र मंडळ , नांदेड " यांनी हिंदु समाजाचे मदतीसाठी प्रबोधन करण्याचे अभियान राबवले, आणि आमचा आत्मविश्वास वाढवला त्याबद्दल आभार मानले आहे
आमच्या गोरक्षक कार्यकर्त्यांना मदत करून, नुसती मदतच केली नाही तर आम्ही जे गोरक्षणाचे कार्य करतोत, त्या कार्याचा गौरव केला आहे, आमच्या साठी हे मदत नसुन पुरस्कार आहे, आपल्या प्रमाणे हिंदु समाज आणि समाजातील विविध संस्था आमच्या सोबत आहेत, म्हणुनच आज नांदेड जिल्ह्यात शेकडो गोरक्षक कार्यकर्ते आपला जिव धोक्यात घालुन गोरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत
खरंतर आता महाराष्ट्रात " प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ " कायदा अस्तित्वात आला आहे, परंतु काही लालची पोलीस अधिकारी कसायांकडुन पैसे घेऊन गाड्या सोडतात म्हणुन आम्हाला रस्त्यावर उतरावे लागते.
या अशा प्रतीकुल परीस्थितीत विश्व हिंदु परिषद आमच्या पाठीशी सक्षमपणे ऊभी आहे, म्हणुनच आम्ही विविध स्तरावर यशस्वी झालो आहोत, या यशाचे श्रेय विश्व हिंदु परिषद व बजरंग दलालाच जाते.असे किरण बिचेवार यांनी सांगितले आहे

0 Comments