Header Ads Widget

भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाल्यामुळे शासनाने हेक्टरी एक लाख रुपये द्यावे - कार्यकर्त्यांचे तहसीलदारांना निवेदन

       माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांचे यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतातील प्रचंड पिकाचे नुकसान झाले असल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांचे अनुदान तात्काळ  जमा करावेत या मागणीसाठी येथील कार्यकर्त्यांचे भोकरच्या तहसीलदारांना निवेदन देऊन कळविले आहे

गेल्या महिन्यात भोकर तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतातील पावसाने प्रचंड नुकसान झाले होते परंतु अद्याप सरकारने कसल्याच प्रकारचे अनुदान जाहीर केले नसल्यामुळे सदरची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यात पडला आहे

अ. पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया शाखा भोकरच्या वतीने शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये तात्काळ अनुदान जाहीर करावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे 

भोकर तालुक्यात दिनांक २४ जुलै २०२३ रोजी व २७ जुलै रोजी मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले यासंदर्भात प्रशासन शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करण्यासाठी कुठले ही ठोस पाऊल उचलत नसल्यामुळे शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे

भोकरच्या तहसीलदारांना निवेदन देणारे कार्यकर्ते चंद्रकांत पाटील मुस्तापुरे तालुका अध्यक्ष व विजय कुमार पाटील मोरे भोकर यांनी सदरची निवेदनाद्वारे मागणी केली आहे 


Post a Comment

0 Comments