Header Ads Widget

शासकीय शाळे बरोबर खाजगी शाळेतील मुख्याध्यापकानी स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना तात्काळ गणवेशाचे वाटप करावे - पालकांची मागणी

        माधव पवार
नायगाव तालुक्यात ग्रामीण भागात येत्या १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे

शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षकासह खाजगी संस्थेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनीला तात्काळ गणवेशाचे वाटप करावे अशी मागणी त्यांच्या पालकातून करण्यात येत आहे

भारतीय स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने सर्व शाळेच्या मुख्याध्यापका सह शिक्षकानी विद्यार्थ्यांना देशभक्तीपर गीते शिकविने गरजेचे असून विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळे स्टेज कॅरिअर व धाडस निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्याकडून भाषण मालेचे कार्यक्रम घ्यावेत त्याच बरोबर खेळांची स्पर्धा घ्यावी त्यामुळे त्यांच्या शरीराला व्यायाम होऊन त्यांचे आरोग्य टवटवीत होईल असे खेळ शाळेत घेणे गरजेचे आहे

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय स्वतंत्र दिन अगदी सात ते आठ दिवसावर येऊन ठेपला असल्यामुळे सर्व शासकीय शाळेतील व खाजगी शाळेतील मुख्याध्यापकानी विध्यार्थाना व मुलीना तात्काळ गणवेशाचे वाटप करावे अशी मागणी त्यांच्या पालकांनी केली आहे  

 

Post a Comment

0 Comments