Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंद बारीत अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर मारला छापा

         माधव पवार 
भारतीय स्वातंत्र्य दिनी प्रशासनानी देशी दारू बंद करण्याचे आदेश असताना सुद्धा मौजे कुंटूर व कृष्णुर येथे बंद बारी
मध्ये चढ्या दराने देशी दारूची विक्री करणाऱ्या अवैध देशी अड्ड्यावर कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल नागोराव बहात्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार कुसमे पोहेका २४८५ पवार पोका २६३८ घुमे पोलीस जीप चालक पोहेका सदाशिव पाटील यांनी छापा मारून  मुद्देमाल जप्त केला आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुंटूर व कृष्णुर येथे परवाना धारक दुकाने शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आली होती परंतु देशी दारूची विक्री चढ्या दराने बंद बारीत देशी आडा चालवणाऱ्या ठिकाणी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार कसमे यांच्यासह पोलिसांनी कारवाई केली आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कुंटूर व कृष्णूर येथे एका प्रो रेड मध्ये देशी दारू भिंगरी संत्राच्या १८० एम.एल क्षमतेच्या एकुण ६० बॉटल किमती ४२०० रुपयांचा मुद्देमाल तर दुसऱ्या प्रो रेड मध्ये विदेशी मेकडॉल नंबर वनचे १३ बॉटल किमती २६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सपोनि विशाल बहात्रे यांनी दिली आहे 

Post a Comment

0 Comments