Header Ads Widget

सावरखेडच्या जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रमाने भारतीय स्वतंत्र दिन साजरा - विद्यार्थ्यांच्या आकर्षक गणवेशाचे छायाचित्राने गावकऱ्या कडून शाळेचे अभिनंदन !!

          माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील सावरखेड च्या जिल्हा परिषद शाळेमध्ये भारतीय स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक कानोले यांच्यासह शिक्षकांनी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चांगलीच चालना मिळवून दिली आहे
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी हम सब एक है हा संदेश शाळेच्या वतीने देण्यात आलेल्या ड्रेस वरून दिसुन या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक भाऊराव कानोले यांच्या हस्ते सकाळी ८ वाजून १५ मिनिटानी ध्वजा रोहण करण्यात आला आहे
नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरखेड येथे पहिली ते आठवी पर्यंत शाळा असल्यामुळे या शाळेत शिक्षण घेण्यासाठी मुले व मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात असुन  विद्यार्थ्यांना शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून स्टेज कॅरिअर व्हावे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक बी पी कानोले यांनी प्रजासत्ताक दिन असो की भारतीय स्वातंत्र दिन असो शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून समस्त गावकऱ्यांचे मने दरवर्षी जिंकतात यांचे ज्वलंत उदाहरण सदरच्या कार्यक्रमा मधून दिसून येत आहे
तालुक्यातील सावरखेडची जिल्हा परिषद शाळा ही एक बार तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहून जावे असा संदेश भारतीय स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी दाखवून दिला आहे

भारतीय स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने यावेळी माजी सैनिकांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला व त्याच बरोबर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ही सत्कार शाळेच्या वतीने व विशेष गावकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आला असल्यामुळे विध्यार्था मध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण झाले आहे
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सांगता सोहळा जी.प.प्रा.शा.सावरखेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रशालेचा मुख्य ध्वजारोहण मुख्याध्यापक बी.पी.कानोले यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत माजी सैनिकांचा सन्मान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला आहे 

सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य तसेच गावातील शिक्षण प्रेमी, पालक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सांस्कृतीक विभाग प्रमुख सौ.अरूणा शिरामणे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रमेश राजूरे यांनी केले तसेच सेवाज्येष्ठ शिक्षक श्री बाबुराव ढगे , श्रीनिवास जाधव, संजय ठक्करवाड, सतीश जानकर, गोविंद कोंपलवाड, बालाजी किसवे,इ.शिक्षकांनी सहकार्य केले गावकऱ्यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचा गौरव केला आहे 


Post a Comment

0 Comments