Header Ads Widget

लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराने जेष्ठ पत्रकार लक्ष्मणराव भवरे सन्मानित.


नायगाव फास्ट न्यूज : नेटवर्क -

नांदेड  लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराने सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव मा.भवरे यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य,मंगेश देवकांबळे गऊळकर युवामंच,स्वाभिमानी राष्ट्रीय रामाद मातंग ग्रुप नांदेडच्या वतीने अशोका बॅक्वेट हाॅल,संविधान अकॅडमी,नांदेड येथे लहुजी शक्ती सेनेचे नवनाथ वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता

कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते तथा,युवा प्रबोधनकार,कवी प्रा.अविनाश भारती,संविधान अकॅडमीचे संस्थापक डाॅ.गंगाधर सोनकांबळे,युवा साहित्यिक सोनू दरेगांवकर,कवी मंगेश देवकांबळे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते लक्ष्मणराव मा.भवरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
या सोहळ्यास राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक शिवा कांबळे,संभाजी बिग्रेडचे नितीन कोकाटे,लक्ष्मण फुलारी, अरुणा पुरी,बार्टीचे समतादूत अमित कांबळे,विनोद पाचंगे, चित्रकार राजेश सरोदे,चांदू देवकांबळे शाहीर नागोराव नामेवार प्रफुल्लकुमार भवरे अरुण गऊळकर कु.उषा सुर्यवंशी

कु.प्राजक्ता पांचाळ,संदीप कळासरे,अक्षय गायकवाड,विशाल आडे आकाश गवाले अतुल सुर्यवंशी कैलास गायकवाड,विकास हिंगोले,रंजना देवकांबळे राधा देडे गिरीजा तोबरे अमोल वाघमारे आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
  
भवरे यांचे पत्रकारिता,सामाजिक,धार्मिक व राजकीय आदी विविध क्षेत्रांत उत्तुंग योगदान आहे.बहुजन चळवळीत सदैव अग्रेसर व्यक्तिमत्त्व म्हणून ते सुपरिचित आहेत,बहुजन टायगर युवा फोर्स प्रदेश प्रवक्ता या पदावर तसेच,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही ते कार्यरत असून मराठी पञकार परिषद मुंबई संलग्न, नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष व नायगांवचे तालुका प्रभारी म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे कार्य केलेले आहे.

अनेक स्तुत्य उपक्रम राबविण्यापाठोपाठ ते शाहीर, कलावंत,पत्रकार व समाजातील प्रत्येक घटकांसह जनतेच्या न्याय व हक्कासाठी त्याचबरोबर,भ्रष्टाचारविरोधी चळवळीत प्रसंगी अनेक आंदोलनात ते सामाजिक भावनेतून अग्रक्रमी असतात त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments